कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी आधार व ॲग्रीस्टॅक आयडी अनिवार्य
अकोला : राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.
Read morehttps://majhishetiinfo.blogspot.com/2026/06/pm-kisan-yojanae-kyc-5522.htmlयोजनेची प्रमुख माहिती शेतकरी कर्जमाफी 2026
योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), राष्ट्रीयीकृत, ग्रामीण अथवा खासगी बँकांकडून १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले आणि ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेले तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पीककर्ज, पुनर्गठीत अथवा फेरपुनर्गठीत कर्जावरील थकबाकीसाठी जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार आहे.
समझोता योजनेचा लाभ
ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी प्रथम अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर एकवेळ समझोता योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे.
तसेच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सर्व कर्ज खात्यांवरील एकत्रित थकबाकीसाठी जास्तीत जास्त ५० हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान
२०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीककर्ज घेऊन वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
- कमाल लाभ – ₹50,000
- कर्जाची रक्कम कमी असल्यास प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम
- किमान लाभ – ₹5,000
निष्कर्ष
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व माहिती वेळेत बँकेत सादर करणे गरजेचे आहे.